नोटाबंदीनंतर कराचे उत्पन्न वाढले; निर्मला सीतारामन यांचा दावा

Nirmala Sitharaman

दिल्ली : देशातील नोटाबंदीला आज (८ नोव्हेंबर) रोजी चार वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नोटाबंदीमुळे झालेल्या फायद्यांबाबतच्या ट्विटमध्ये दावा केला की, नोटाबंदीनंतर कराचे उत्पन्न वाढले. त्या म्हणाल्या, भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन पाळण्यासाठी मोदी सरकारने चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नोटाबंदी लागू केली होती.

काळ्या पैशांवर अभूतपूर्व हल्ला करणारे  पाऊल उचलल्याने चांगले कर नियोजन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली. “नोटाबंदीनंतर पहिल्या चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांची अघोषित मिळकत जप्त करण्यात आली. गेल्या तीन वर्षात ३,९५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली.

सर्वेक्षणानंतर अनेक कोटी रुपयांच्या बेनामी मिळकती उघड झाल्यात. ‘ऑपरेशन क्लीन मनी’मुळे अर्थव्यवस्था औपचारिक बनवण्यास मदत झाली.” अशी माहिती त्यांनी दिली. दुसऱ्या ट्विटमध्ये सीतारामन म्हणाल्या, “नोटाबंदीने केवळ पारदर्शकताच आणली नाही तर कराचा परीघ वाढवला. यामुळे बनवाट चलनावरही अंकुश मिळवता आला.” दरम्यान, काँग्रेसने सोशल मीडियातून नोटाबंदीविरोधात बोलण्याबाबत एक अभियान चालवले.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, “नोटाबंदीचा मुख्य उद्देश मोठ्या कर्जबुडव्यांचं कर्ज माफ करणं हा होता. नोटाबंदीमुळे जीडीपी वाढीच्या दरात २.२ टक्के घट तर रोजगारामध्ये ३ टक्क्यांनी घट झाली.” ८ नोव्हेंबर २०१६ रोजी  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. विरोधकांनी आरोप केला होता की, सरकारच्या या कृतीमुळे अर्थव्यवस्था घसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER