पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन ; राज्यातील चक्रीवादळासंदर्भात घेतली माहिती

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील काही भागात तौत्के चक्रीवादळाचे (tauktae cyclone) थैमाग घातले आहे . मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन करून चक्रीवादळ परिस्थितीविषयी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे .

हवामान विभागाने (IMD)ने नवा इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असलं, तरी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका देत ते पुढे सरकत आहे.

दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button