‘तौक्ते’ चा तडाखा : मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद

tauktae cyclone-Mumbai Airport and Bandra-Worli sea link closed

मुंबई :- अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) तडाखा मुंबईला बसला. मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून होणारी वाहतूक पुढील तीन तासांसाठी थांबवण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे वादळ गुजरातकडे सरकते आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकते आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.

सध्या चक्रीवादळ मुंबईपासून १६० किमी अंतरावर आहे. तर दीवपासून ८४० किमी अंतरावर आहे. चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केल्यानं मुंबईत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढणार असून, तासी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग तासी १७० ते १८० राहणार आहे.

अजित पवारांनी घेतला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली

मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद

चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून, मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून होणारी वाहतूक पुढील तीन तासांसाठी थांबवण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० कि. मी. वेगाने वारे वाहणार असून, काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात ताशी ७५ ते ८५ कि. मी. वेगाने वारे वाहणार असून, वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये ३८९६, सिंधुदुर्ग १४४ आणि रायगडमध्ये ८,३६० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button