तौत्के चक्रीवाद ; रायगडमध्ये राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Tauktae cyclone-In Raigad wall collapse

रायगड :- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील (Raigad News) उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू (Woman killed) झाल्याची माहिती समोर आली आहे .

माहितीनुसार, रायगडमधील उरणमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी गेला आहे. उरण शहरातील बाजारपेठेत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळली आहे. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे रायगडमध्ये खोपोलीतील काजुवाडी येथील वस्ती मध्ये दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. खोपोली नगरपालिका यत्रंणानी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे .

दरम्यान कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना समोर आली.

ही बातमी पण वाचा : ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक तीव्र, मुंबईसह उपनगरात सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button