तौक्ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच तौत्के चक्रीवादळाने (Tauktae cyclone) कोकणासह इतर जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे कोकणवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुष्टचक्रात अडकलेल्या कोकणवासीयांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न आता राज्य सरकार करणार आहे. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच तौत्के चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दौऱ्यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button