फडणवीसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर

uddhav-thackeray-fadnavis Tauktae Cyclone

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Raigad, Ratnagiri and Sindhudurg in Konkan) या जिल्ह्यांतील किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. बुधवारी आणि गुरुवारी त्यांचा पाहणी दौरा असणार आहे.

फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत.

कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती दिली .मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचेही सावंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button