अ‍ॅमेझॉनला धडा शिकवला…; मनसे नेत्याचे ट्विट

Sandeep deshpande & Amazon

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला . या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करून मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

अमेझॉनला धडा शिकवला. सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन , अशा शब्दांमध्ये ट्विट करून संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यभरातील अ‍ॅमेझॉनची कार्यालये फोडण्याचा सपाटा सुरू केला होता. अखेर अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन द्यावं लागले . यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती देखील मनसे नेत्याने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER