संसद भवनाच्या निर्मितीसाठी ‘टाटा’ची निवड २ जी च्या निकषावर ? स्वामींची टीका

Subramanian Swamy

दिल्ली : नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी टाटाची निवड कशी झाली? असा प्रश्न करणारे खळबळजनक ट्विट भाजपाचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी केले असून अप्रत्यक्षपणे याची तुलना २ जी घोटाळ्याशी केली आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, कुणाला माहिती आहे का, नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी टाटाची निवड कशी झाली होती? यासाठी बोली लावली गेली होती की 2जी स्पेक्ट्रम (2G criteria) घोटाळ्याप्रमाणे जो पहिले आला त्यालाच दिले?

स्वामींच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजर्सने लिहिले – स्वामीजी, तुम्ही काहीपण करा पण कधीच अर्थमंत्री होऊ शकणार नाहीत. तर, दुसऱ्याने म्हटले आहे – तुम्हाला एवढीच अडचण आहे तर भाजपा सोडून का देत नाही? पंतप्रधान तुमच्या पेक्षा जास्त समजदार आहेत.

नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असेल. जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा संसद भवनाची नवी इमारत ही १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार असून ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. या इमारतीचे डिझाईन एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने तयार केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER