ऑक्सिजन तुटवडा भासत असल्याने टाटांचा पुढाकार; पंतप्रधानांनी केले कौतुक

PM Narendra Modi - Ratan Tata

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशात आता टाटा उद्योग समूहानेही मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा समूहाने केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टाटा समूहाचे (TATA Group) कौतुक केले आहे.

देशात ही कोरोना संसर्गाची दुसरी लाट आहे. यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देश हा कोरोना महामारीशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाने जनतेच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यांनी द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.

द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात होणार आहे. “देशातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यास आम्ही मदत करत आहोत. कोरोनाविरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे टाटा समूहाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी टाटा स्टीलच्यावतीने रोज ३०० टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button