
अमेरिकेची कार निर्माती टेस्ला (Tesla) सोबत संयुक्त उद्योग उभारणीबाबत टाटा (Tata) मोटर्सची बोलणी सुरू नाहीत, असे टाटाने स्प्ष्टपणे सांगितले. मात्र, याबाबत सुरू असलेल्या चर्चा अगदीच निराधार नाहीत.
टेस्लाने भारतात उद्योग सुरू करण्यासाठी ‘टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रा. लि. (Tesla India Motors and Energy) नावाने बंगरुळू येथे कंपनीची नोंदणी केली. कंपनी इलेक्ट्रिक वाहने तयार करणार आहे. कारखाना सुरू करण्यासाठी कंपनी काही राज्य सरकारांची चर्चा करते आहे. तसेच कारखाना सुरू करण्यासाठी स्थानिक भागीदारही शोधते आहे.
टेस्लाच्या भारतातील संभाव्य भागीदारात देशातील आघाडीच्या टाटा मोटर्सचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. या चर्चेचा प्रभाव इतका होता की, यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात टाटा मोटर्सचे शेअर्स तेजीत होते.
दरम्यान, शुक्रवारी टाटा मोटर्सच्या ‘ईव्ही विंग’ने केलेल्या ट्विटमुळे या चर्चेला बळ मिळाले. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्यातील दोन ओळी वापरून ट्विट केले होते – “आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हैं अखबार में, सब को मालूम है और सबको खबर हो गई!”, हे ट्विट टेस्ला आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांना टॅग केले होते. वेलकम टेस्ला आणि टेस्लाइंडिया हॅशटॅग्स. मात्र, हे ट्विट नंतर हटविण्यात आले.
टाटा मोटर्सने म्हटले आहे की, आम्ही आमच्या प्रवासी वाहन उत्पादनासाठी भागीदार घेण्याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, कर्नाटक सरकारने कारखाना उभारण्यासाठी बेंगरुळूच्या टुमकूर भागात टेस्लाला जमीन देण्याची ऑर दिली आहे, अशी बातमी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला