बनवा टेस्टी ‘चुरमा लाडू’

churma ladoo

चूरमा लाडू हे गुजरात आणि राजस्थानमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. हे मुख्यतः गव्हाचं पीठ आणि गूळ किंवा साखर मिळवून बनवले जातात . जर तुम्हाला लाडू हा प्रकार आवडीचा असेल तर हि नवीन रेसिपी ट्राई करा. खायला अगदी सॉफ्ट आणि अत्यंत टेस्टी होतात.

साहित्य :-  चुरमा लाडू

  • २ कप गव्हाचे पीठ
  • १ कप बेसन
  • १/२ कप साखर
  • १/४ कप पाणी
  • १/२ कप तूप
  • १/२ टीस्पून वेलची पावडर
  • १/४ टीस्पून जायफळ पावडर
  • आवडीचे ड्राय फ्रुटस

कृती :-  गव्हाचे पीठ ,बेसन एका भांड्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन त्यात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. १० मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. आणि हाताने मुठे तयार करून घ्या. कढईत तूप किंवा तेल गरम करावे. आणि तयार केलेले मुठे मंद आचेवर तळून घ्यावेत. मुठे तळल्यावर खुसखुशीत होतात. त्याचे तुकडे करून त्यांना थंड होऊ द्या. नंतर मिक्सर मधून बारीक घ्या. तो अगदी रव्यासारखा होतो. तुमचा चुरमा तयार. आता अर्धा कप तूप गरम करून त्यात पावडर साखर घाला. लगेच गरम मिश्रण चुरम्या मध्ये घाला. त्यात वेलची आणि जायफळ पावडर घाला. आवडीचे ड्राय फ्रुटस घाला. मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. थोडं गरम असतानाच लाडू वळून घ्या. तुमचे चूरमा लाडू तयार. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारातही बनवू शकता.