…तोपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही ; महिला आयोग सदस्यावर भडकल्या उर्मिला मातोंडकर

Urmila Matondkar & Chandramukhi Devi

मुंबई :  उत्तरप्रदेशात बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखीदेवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. मात्र, यावेळी चंद्रमुखीदेवी (Chandramukhi Devi) यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे .

शिवसेनेच्या  (Shivsena) उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही मानसिकताच मुळात आतमधून बदलण्याची गरज आहे. तोपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला दोषी कसे म्हणू शकते? हे अत्यंत निराशाजनक आणि दुर्दैवी आहे, असे ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER