अनंत चतुर्दशीनिमित्त तारापोरवाला मत्स्यालय राहणार बंद

अनंत चतुर्दशीनिमित्त तारापोरवाला मत्स्यालय राहणार बंद

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात असून दि. 13 सप्टेंबरपासून मत्स्यालय नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी खुले राहील, असेही त्यांनी कळविले आहे.