रणबीरनंतर अभिनेत्री तारा सुतारिया कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक देशातील कोरोना बाधितांचाही आकडा वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडकरांनाही कोरोनाने विळखा घातला आहे .रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) , मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आणि आता या यादीत अभिनेत्री तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) नावाचाही समावेश झाला आहे. तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे.

माहितीनुसार, तारा सुतारियाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट ‘तडप’चे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER