हीरोच्या बायकोमुळे चित्रपटातून काढून टाकले होते तापसी पन्नूला

Taapsee Pannu

सध्या तापसी पन्नू (Taapsee Pannu) दक्षिणेतील चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक चित्रपट यशस्वी झालेले आहेत. परंतु चित्रपट करिअरच्या सुरुवातीच्या काळात तापसीला खूप अपमान सहन करावा लागला होता. ती दिसायला सुंदर नाही तसेच की अनलकी आहे असेही म्हटले जात होते. परंतु या सर्व अपमानाकडे दुर्लक्ष करीत तापसीने आपल्या कामावर लक्ष दिले आणि सध्याचे यश मिळवले आहे. परंतु सुरुवातीचा अपमान ती अजूनही विसरलेली नाही. तापसीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला मला चित्रपटात घेण्यास निर्माते तयार नसत. एवढेच नव्हे तर एकदा एका चित्रपटात मी नायिका म्हणून काम करीत असताना नायकाच्या बायकोने मला चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले होते. आणि निर्मात्याने तिचे ऐकले होते.

तापसीने मुलाखतीत सुरुवातीच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. तापसी म्हणते, मी सुंदर नाही असे लोक मला म्हणत. याचा माझ्या मनावर परिणाम होत असे परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकले होते. केवळ अभिनयच नव्हे तर वेळोवेळी माझा अपमान केला जात असे. हीरोच्या बायकोचा किस्सा मी सांगितलाच आहे. एकदा तर एका चित्रपटाचे डबिंग करताना हीरोला माझे डायलॉग आवडले नाही म्हणून त्याने ते बदलण्यास सांगितले आणि ते बदलण्यातही आले. मी याला नकार दिला होता. परंतु मी गेल्यानंतर एका डबिंग आर्टिस्टकडून माझे डॉयलॉग नव्याने डब करून घेण्यात आले. एका नायकाचा अगोदरचा चित्रपट चालला नव्हता आणि त्याच्या नव्या चित्रपटात मी नायिका होती. तेव्हा निर्मात्याने मला माझी फी कमी करण्यास सांगितले. निर्माता म्हणाला. बजेट नाही त्यामुळे तुझी फी कमी कर. खरे तर नायकाची फी कमी करायला हवी होती पण त्याऐवजी माझ्या फीवर डोळा ठेवण्यात आला. एका नायकाने तर चित्रपटातील माझा इंट्रोडक्शन सीनच बदलण्यास सांगितला होता. त्याला वाटत होते की त्याच्या इंट्रोडक्शन सीनपेक्षा माझा सीन जास्त चांगला झाला आहे आणि तो प्रेक्षकांना जास्त आवडेल. अशा अनेक गोष्टी माझ्याबाबतीत घडलेल्या आहेत.

तापसी पुढे म्हणते, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरु ठेवले. आज चित्रपटांचा च्वाईस माझ्या हातात आहे. मला जे चित्रपट करावेसे वाटतात तेच मी करते. एखाद्या नायिकेने वुमेन ओरिएंटेड चित्रपट केले की, नायक तिला नायिका बनवण्यास कचरतो. परंतु मी सध्या हे सगळे एंजॉय करीत आहे असेही तापसीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER