तापसी पन्नूने ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात

Rashmi Rocket

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsi Pannu) ने सोशल मीडियावर ‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket) चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तिने सांगितले की, तिने रश्मी रॉकेट या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

गुजरातमधील कच्छच्या पार्श्वभूमीवर, तापसी एका ऍथलेटची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘कारवां’ चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षर खुराना हे दिग्दर्शन करीत आहेत.

इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, तापसीने लिहिले, “चला करूया, रश्मी रॉकेट”. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांची कंपनी ‘आरएसव्हीपी’ च्या बॅनरखाली केली जात आहे. चित्रपटाचे शूटिंग मागील आठवड्यात सुरू झाले होते.

‘अमेझॉन प्राइम’ व्हिडिओच्या ‘मिर्झापूर २’ या वेब सीरिजमध्ये दिसलेला प्रियांशु पैन्यूली या चित्रपटात सोबत दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

Let’s do this ! 🏃🏻‍♀️ #RashmiRocket

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER