तापसीच्या बॉयफ्रेंडने शेअर केला दोन्ही बहिणींसोबत जेवतानाचा व्हीडियो

Taapsee Pannu - Mathias Boe

तापसी पन्नूने (Taapsee Pannu) बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केलेेले आहे. कोणीही गॉडफादर नसताना केवळ अभिनयाच्या आणि मेहनतीच्या बळावर तापसीने साऊथ आणि हिंदीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नायिकाप्रधान सिनेमासाठी तापसीच्या नावाची चर्चा अगोदर होते आणि हेच तिने मिळवलेले यश आहे. अन्य तरुण नायिकांप्रमाणेच तापसीही डेटिंग करीत असून बॉयफ्रेंड मथायससोबत वेळ घालवताना दिसते. तापसीचा बॉयफ्रेंड डेन्मार्कचा प्रख्यात बॅडमिंटन खेळाडू आहे. 2012 मध्ये त्याने समल ऑलंपिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते तर 2015 मध्ये यूरोपियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. तापसी आणि मथायस गेल्या अनेक वर्षांपासून डेटिंग करीत आहेत. पण तापसीने कधीही तिच्या बॉयफ्रेंडबाबत किंवा त्यांच्या रिलेशनबाबत माहिती दिली नव्हती किंवा कधी चर्चाही केली नव्हती. पण गेल्या काही महिन्यांपासून मात्र तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड सोशल मीडियावर फारच सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

तापसी सध्या ‘लूट लपेटा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून मंगळवारी तिने तिच्या या नव्या सिनेमाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फर्स्ट लुकसोबत तापसीने लिहिले होते, ‘जीवनात कधी कधी अशी वेळ येते की एखादी गोष्ट कशी पूर्ण केली असा प्रश्न मनात उभा राहातो. मीसुद्धा हाच विचार करीत होते. हाय मी सावी एक बोर्ड क्रेजी यात्रेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत. सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिजी असली तरी तापसी बॉयफ्रेंडबरोबर फिरण्यासाठी वेळ काढतेच. तापसी बहिणीसोबत मथायससोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. तापसीने तिघांचा व्हीडियो शेअर करण्यापूर्वीत मथायसने त्यांचा व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडियोत तिघेही कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेलेले दिसत आहेत. तापसीची बहिण मथायसच्या अत्यंत जवळ बसली असून तापसी थोडी दूर आहे. या व्हीडियोला मथायसने ‘पन्नूस के साथ’ असे कॅप्शन दिलेले आहे. मथायस आणि तापसी यावर्षी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तापसीने याबाबत अजून तरी मौन बाळगलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER