तापसी पन्नूच्या बॉयफ्रेंडने केंद्रीय मंत्र्यांकडे मागितली मदत

गेल्या तीन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) घरी आणि ऑफिसवर आयकर विभागाने छापे टाकून चौकशी सुरु केली आहे. या दोघांनी जवळ जवळ 350 ते 400 कोटी रुपयांची अफरातफरी केल्याचे सांगितले जात आहे. तापसीकडे तर पाच कोटी रुपयांची एक कॅश रिसीप्टही सापडली ज्याचे उत्तर ती देऊ शकलेली नाही. तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये नुकतेच स्वतःचे स्थान निर्माण केलेले असून तिच्याकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे तिच्या करिअरला काहीसा ब्रेक लागू शकतो. त्यामुळेच तापसीच्या बॉयफ्रेंडने या प्रकरणात तापसीला मदत करावी म्हणून थेट केंद्रीय मंत्र्यांना साद घातली. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी कायद्यानुसार सर्व काही होईल असे म्हणत त्याला चांगलेच उत्तर दिले.

तापसी पन्नू गेल्या काही काळापासून डेन्मार्कचा नागरिक असलेला प्रख्यात बॅडमिंटनपटू मथायस बोएबरोबर डेटिंग करीत आहे. 11 जुलै 1980 ला जन्मलेल्या मथायस ने 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते. तसेच 2015 मध्ये यूरोपियन गेम्समध्ये त्यांने गोल्ड मेडल जिंकले होते. आयकर विभागाने तापसीची चौकशी सुरु केल्याने मथायसने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे, ‘मी सध्या खूपच त्रासात आहे. एक तर प्रथमच मी भारतीय टीमचा कोच म्हणून काम करणार आहे आणि दुसरीकडे आयकर विभागाने तापसीच्या घरी छापा मारला आहे. त्याने पुढे लिहिले आहे, ‘आयकर विभाग या छाप्यातून तापसीच्या परिवाराला जबरदस्तीने त्रास देत आहे. यासोबतच मथायसने त्याची ही पोस्ट केंद्रीय मंत्री किरण रिजूजी यांनाही टॅग करीत काही तरी करा अशी विनवणी केली होती. यावर किरण रिजूजी यांनी, ‘कायदा सर्वोपरी असून आपण सगळ्यांनी त्याचे पालन केले पाहिजे. हे प्रकरण तुझ्या आणि माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे आहे. आपण देशातील खेळांच्या विकासावर लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या व्यावसायिक कर्तव्याचे पालन केले पाहिजे.’ असे उत्तर देऊन मथायसचा आवाजच बंद करून टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER