विदाऊट हेल्मेट बाईक चालवल्याने तापसी पन्नूला झाला दंड

Tapsee Panu

कधी कधी कलाकारांना वाटते त्यांनी काही केले तरी ते चालून जाते. त्यामुळे अनेकदा बॉलिवूडमधील कलाकार रस्त्यावर हेल्मेट न घालताच बाईक चालवताना दिसतात. अनेकदा आरटीओवाले या कलाकारांना सोडूनही देतात. मात्र कधी कधी दंडही करतात. याचा फटका नुकताच अभिनेत्री तापसी पन्नूलाही बसला आहे.

तापसी पन्नू सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. दोन दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती हेल्मेट न घालता बाईक चालवताना दिसत आहे. फोटोसोबत कॅप्शन देताना तापसीने लिहिले आहे की, हा फोटो काही दिवसांपूर्वीचा आहे. मी हेल्मेट न घालता बाईक चालवत असल्याने मला दंड भरावा लागला आहे.

तापसी सध्या आकाश खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेचा हा फोटो आहे. फोटोला तापसीने कॅप्शन देताना, एका जागेवरून दुसर्‍या जागेकडे प्रवास असे लिहिले आहे. तापसीचा हा फोटो खूपच व्हायरल झाला असून अनेक सेलिब्रिटीजनी कमेंटही केल्या आहेत. निर्माता दिग्दर्शक अनुभव सिन्हाने कमेंट करताना लिहिले आहे की, अशी बाईक यावर तुला कोणीही पकडू शकणार नाही.

‘रश्मी रॉकेट’चे शूटिंग पुढील वर्षी पूर्ण होणार असून पुढील वर्षीच हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER