तनुश्री दत्ता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतली

Tanushree Dutta - Nana Patekar

दोन-तीन वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत खळबळ माजवली होती. बॉलिवूडमध्ये (Bollywood) मी टू मोहिम सुरु करण्यात तिचा मोठा हात आहे. अभिनय सोडून अमेरिकेत नोकरी करण्यासाठी गेलेली तनुश्री दत्ता आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतली आहे. तनुश्रीने इन्स्टाग्राम वर याबाबत एक मोठी पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

तनुश्री लॉस एंजेलिसमध्ये एका आयटी कंपनीत ट्रेनिंग घेत होती. तनुश्रीनेच पोस्टच्या सुरुवातीला ही माहिती देऊन पुढे म्हटले आहे की, मला अमेरिकन सरकारच्या डिफेंस सेक्टरमध्ये एक चांगली नोकरी मिळत होती. परंतु त्यासाठी मला नेवाडाला जावे लागणार होते आणि तीन वर्षांचा करार करावा लागणार होता. मात्र मला पुन्हा एकदा अभिनय करण्याची इच्छा होत होती त्यामुळे मी ती नोकरी सोडून आता पुन्हा मुंबईला परतले आहे. मला काही वेबसीरीज आणि चित्रपटांच्या ऑफऱ आल्याची माहितीही तनुश्रीने पोस्टमध्ये दिली आहे. बॉलिवूड तनुश्रीला आता कसे स्वीकारते ते पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER