15 किलो वजन कमी केले तनुश्री दत्ताने

Tanushree Dutta

नाना पाटेकवर (Nana Patekar) लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) पुन्हा बॉलिवूडमध्ये परतत असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होतीच. बॉलिवूूडमध्ये झीरो फिगरच्या नायिकांना चित्रपट मोठ्या प्रमाणावर ऑफऱ केले जातात. त्यामुळे प्रचंड वजन वाढलेल्या तनुश्रीने व्यायामावर भर देत आता चक्क 15 किलो वजन कमी केले आहे. मी आता बॉलिवूडमध्ये काम करण्यास तयार झाल्याचे तिने म्हटले आहे.

वजन कमी केल्याने तनुश्री आता पूर्वीप्रमाणे नव्या अवतारात सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे. वजन कमी करण्याबाबत तनुश्रीने सांगितले, गेल्या काही वर्षात माझे वजन चांगलेच वाढले होते. त्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोणही बदलला होता. मला स्वतःलाही ते जाणवत होते. खूप जण मला माझ्या वाढत्या वजनामुळे बोलतही असत. एखाद्याला लाजवण्यासाठी असे सर्रास बोलले जाते. मला त्यामुळे खूप वाईट वाटत असे. मी इमोशनल रोलर कोस्टरमधून त्या काळात जात होते. त्यानंतर मात्र मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि डाएट प्लॅनसह एक्सरसाईज करीत राहिले आणि आज माझे हे नवे रुप समोर आले आहे. वजन कमी झाल्याने मला आता बरे वाटत आहे असेही तनुश्रीने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER