तन्मय दूरचा नातेवाईक; कोरोना लसीवरील सवालानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हात झटकले आहेत. नियम तोडून लस कशी घेतली, हे आपल्याला माहीत नसल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. तन्मय अभिजित फडणवीस याच्या बाबतीत मी लेखी निवेदन दिलं आहे. त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले.

तन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजित फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. तन्मय लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

दरम्यान येत्या १ मेपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु त्याआधीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली, हा प्रश्न विचारला जात आहे. फडणवीसांनी हात वर केल्यानंतरही, लांबचा नातेवाईक असेल, तर दोघांचे इतके एकत्र फोटो कसे? चुलत भावाचा मुलगा दूरचा नातेवाईक होतो का? असे अनेक सवाल सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांवरील आरोपांची हवा राजेंद्र शिंगणे यांनी काढली नवाब मलिक तोंडावर पडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button