तमिळनाडू : कमल हासनचा भाजपाच्या वानती श्रीनिवासननी केला पराभव

Vanathi Srinivasan-Kamal Haasan

कोयंबतूर :- भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांनी राजकारणात प्रवेश करणारा अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) याचा पराभव केला.

कमल हासन दक्षिणेतील आघाडीचे अभिनेते आहेत. दक्षिणेतील राज्यात चित्रपट कलाकारांना राजकारणात चांगले यश मिळत असल्याने त्यांनी मक्कल नधि मय्यम (Makkal Needhi Maiam) पक्षाची स्थापना करून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. कमल हासन यांच्या उमेदवारीमुळे कोयंबतूर दक्षिण हा मतदारसंघ चर्चेत आला होता. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष यावर लागून होते. या मतदारसंघात कमल हासन (मक्कल नधि मय्यम), वानती श्रीनिवासन (भाजपा) आणि मयूरा एस. जयकुमार (काँग्रेस) उमेदवार होते. वानती श्रीनिवासन विजयी झाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button