तामिळनाडू : जंबुकेशवर शिवमंदिरात सापडला सोन्याचा हंडा

jambukeshwarar-temple

तिरुचिरापल्ली : जिल्ह्यातील तिरुवनैकवल येथील जंबुकेशवर शिवमंदिरात खोदकाम सुरू असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला. हंड्यात ५०५ नाणी आहेत. या नाण्यांचे वजन १. ७१६ किलो आहे. या सोन्याची किंमत किमान ६८ लाख आहे. नाणी दोनशे ते चारशे वर्ष जुनी असावीत असा अंदाज आहे. ही नाणी पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत.

हे मंदिर चोल राजघराण्यातील कोचेन्गनन याने ९व्या शतकात बांधले आहे. १८०० वर्ष जुन्या चोल राजवंशातील या मंदिराशी संबंधित १५६ शिलालेख सापडले आहेत यावरून या मंदिराचे महत्त्व लक्षात येते.

मंदिर परिसरात जुन्या काळी जांभळाचे जंगल होते म्हणून या मंदिराचे नाव जंबुकेशवर पडले. मंदिरात शिव – पार्वतीची पूजा होते.