शेतकरी आंदोलनाच्या नावावर सुरू आहे तमाशा – पाशा पटेल

कोल्हापूर : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप आले आहे. आंदोलनाच्या नावावर तमाशा सुरू आहे अशी तिखट टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणालेत, दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत शेतकयांच्या आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू आहे! तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळले नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावावरून तमाशा करण्यात रस आहे.

पवारांवर टीका

पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. ते म्हणालेत, शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER