फोन टॅपिंग टाळण्यासाठी खाजगी मोबाईल क्रमांकाने बोला, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सूचना

CM Uddhav Thackeray

मुंबई : काही दिवसांपूर्वीच खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणानंतर (phone tapping case) आता ठाकरे सरकार(Thackeray Govt) सावध झाले आहे. अशाप्रकारच्या प्रकरणांना बाहेर येऊ न देण्यासाठी ठकरे सरकारने आपल्या मंत्र्यांना खास सूचना दिल्या आहेत. सर्व मंत्र्यांनी फोन किंवा कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवावे. तसेच महत्त्वाच्या गोष्टींवर बोलण्यासाठी खासगी मोबाईल क्रमांकांचा वापर करावा (Talk on a private phone for important work), असेही मंत्र्यांना आवर्जून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस दलातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची इत्यंभूत माहिती फडणवीस यांच्या हाती लागली होती. हा डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते. तसेच याप्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, असा आग्रह आता भाजपने धरला आहे.

त्यामुळे आता सावध झालेल्या ठाकरे सरकारने प्रत्येक पाऊल जपून टाकायचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही मंत्र्यांनी आतापासूनच खाजगी मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हे क्रमांक ट्रेस करता येऊ शकत नसल्याने फोनच टॅपिंग होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा :  राज्यात पुन्हा पोलीस अधिकारी विरुद्ध सरकारचा रंगणार का कलगीतूरा ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER