आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला; फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोलावे आणि नंतर देशातल्या शेतकऱ्यांची उदाहरणे  द्यावीत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केली.

ते म्हणालेत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फुटकी कवडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आणि उद्धव ठाकरे देशातल्या शेतकरी आंदोलनाची उदाहरणे  देत आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात काय दिवे लावले? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल   

या सरकारने फक्त एक दिवसाचे  अधिवेशन घेतले आहे. चर्चेपासूनही सरकार पळपुटेपणा करते आहे. चर्चा करायची नाही आणि वेळ मारून न्यायची, असे या सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये ही सरकारची भूमिका आहे, असा आरोप फडणवीस यांनी पुन्हा एकदा केला.

मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राबाबत बोलले पाहिजे. बोंड अळी, खोड किडीने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्याला मदत कधी करणार? सरकार दिलेले आश्वासन विसरले आहे. देशात काय चालले  आहे? जगात काय चालले आहे? हे सांगून सरकार वेळ मारून नेत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER