काश्मीर प्रश्न अफगाणिस्तानशी जोडण्याला तालिबानचा विरोध; पाकिस्तानला झटका

- वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा सल्ला

Imran Khan

भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर तालिबानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी भारत आणि पाकिस्तानला हिंसाचार होईल अशी पावले उचलण्यापासून दूर राहण्याची विनंती केली आहे. शिवाय काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे! पाकिस्तानला हा मोठा झटका आहे.


नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर तालिबानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी भारत आणि पाकिस्तानला हिंसाचार होईल अशी पावले उचलण्यापासून दूर राहण्याची विनंती केली आहे. शिवाय काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे! पाकिस्तानला हा मोठा झटका आहे.

तालिबानने जारी केलेल्या या निवेदनामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांना आश्चर्य वाटले. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून तपासून घेतल्यानंतर ते खरे असल्याचे भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

काश्मीर प्रश्नावर तालिबानने घेतलेली ही आश्चर्यकारक आहे. कारण तालिबान पाकिस्तानचा खंदा समर्थक मानला जातो. तालिबानला पाकिस्ताननेच तयार केले आहे. काश्मीर प्रश्नावर तालिबानची ही भूमिका पाकिस्तानसाठी एक झटका आहे. यापुढे तालिबानने काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानला काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, हे उल्लेखनीय.

अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याच्या मोबदल्यात अमेरिकेने काश्मीरच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा अशी पाकिस्तानची भूमिका आहे. त्याच वेळी तालिबानला सुद्धा अमेरिकेबरोबर करार करण्याची इच्छा आहे. पण यात काश्मीरच्या मुद्दा आणला तर ही प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते; हा धोका टाळण्यासाठी तालिबानने हे निवेदन प्रकाशित केले असावे, असा राजकीय निरीक्षकांच्या अंदाज आहे.

तालिबानने निवेदनात म्हटले आहे की – आम्हाला युद्धाचा खूप वाईट अनुभव आहे. त्यामुळे शांतता बाळगा आणि प्रादेशिक मुद्दे सोडवण्यासाठी विवेकी मार्गाचा वापर करा. काश्मीरमधील असुरक्षितता संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांनी, ओआयसी, इस्लामिक देश आणि संयुक्त राष्ट्राने रचनात्मक तसेच विधायक भूमिका बजावावी.