घरगुती वीज बिल माफीसाठी २७ ऑक्टोबरला राज्यात महावितरणच्या कार्यालयाला ताला ठोको आंदोलन

Tala thoko agitation

कोल्हापूर : ‘दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करणेत यावीत व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी या मागणीसाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या “जिल्हा कार्यालयांना ताला ठोको” आंदोलन मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक १२ वाजता करण्यात येईल असे आज महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर ताला ठोको मध्ये जिल्ह्यातील किमान १० हजार वीज ग्राहक व शेतकरी सहभागी होतील असे राजू शेट्टी, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील किणीकर, बाबा पार्टे इ प्रमुखांनी जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER