हायवेवर झोपून काढत होते सेल्फी; मागून आली पोलिसांची गाडी आणि…

Police.jpg

हैदराबाद :- सेल्फी काढण्यासाठी लोक अनेक उपद्व्याप करतात. चांगली जागा दिसली की लगेच सेल्फी काढण्यासाठी सज्ज होतात. गड – किल्ले असो, समुद्र असो किंवा हायवे! असाच एक विचित्र प्रकार हैदराबादमधील हायवेवर (Hydrabad Highway) घडला. दुरूगाम छेरुवू द्रुतगती मार्गावर दोन मुलं पुलावर झोपून सेल्फी काढत होते. फोटो चांगले येण्यासाठी वेगवेगळ्या अॅंगलनं फोटो काढण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता. तेवढ्यात पोलीस आले आणि त्यांना पकडून नेले!

नुकताच बांधण्यात आलेला दुरूगाम छेरुवू द्रुतगती मार्ग सध्या सेल्फी पॉइंट (Selfie Point) झाला आहे. लोक रस्त्यावर गाड्या थांबवून सेल्फी काढतात! अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या पुलावर सीसीटीव्हीही लावले आहेत.

१ ऑक्टोबर रोजी दोन मुलं  या पुलावर झोपून सेल्फी काढत होते. फोटो चांगले येण्यासाठी वेगवेगळ्या अॅंगलनं फोटो काढण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता. एक मुलगा रस्त्यावर झोपला आणि दुसरा फोटो काढत होता. पोलीस हे सर्व सीसीटीव्हीत पाहात होते. मुलांना ‘सरप्राईज’ देत मोटार घेऊन पोलीस हजर झालेत. एकाने पळून  जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी दोन जणांना पकडून नेले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी नागरिकांना असे स्टंट करू नका असा इशारा दिला आहे.  मात्र  लोक पुलावर गाडी थांबवून फोटो काढत असतात. काही दिवसांपूर्वी, नागरी कार्यकर्ते साई तेजाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात एक जोडपे रस्त्याच्या मधून चालत होते. यानंतर पोलिसांनी पुलावर विनाकारण थांबणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER