भेसळयुक्त बियाण्यांची तक्रार आल्यास संबंधित कंपनीवर कारवाई होणार

court

रत्नागिरी/प्रतिनिधी : निकृष्ट प्रतीच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आणि तशी तक्रार आल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिल्या आहेत. संबंधित कंपनीवर फौजदारी दाखल करुन बियाणांचे वाणही जप्त करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्याच्या खरीप क्षेत्रात पेरण्यांची कामे सुरू असून शेतकरी पाऊस नसल्याने लावणीच्या प्रतीक्षेत आहे.

मात्र, बाजारात उद्भवलेल्या स्थितीची गैरफायदा घेऊन कोणी बनावट बियाणे अथवा भेसळयुक्त खत वितरित करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकामार्फत शेतकरी वापरत असलेल्या वाणांची तपासणी करण्यात येत असून नोंदी घेतल्या जात आहेत. यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER