मी खासदारकीचा राजीनामा देतो बॅलेटने मतदान घ्या : खा. उदयनराजेंचे आव्हान

Udayanraje Bhosle

मुंबई : राज्यात साता-याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत सरकारला आव्हान देताना म्हटले कि, मी खासदारकीचा राजीनामा देतो, त्यानंतर सातारा मतदारसंघात मतपत्रिकेच्या माथ्यमातून निवडणूक घ्या.

ते म्हणाले “या निवडणुकीत ईव्हीएमव्दारे झालेले मतदान आणि मतमोजणीत आढळलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली, तरी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलायला तयार नाही. हा लोकशाहीचा घात असून काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो. त्यानंतर सातारा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. सातारा इथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली.

ते म्हणाले, “जगभरातील प्रगत देश बॅलेटपेपरवर मतदान घेत आहेत आणि आम्ही विश्वासार्हता नसलेल्या ईव्हीएमचा वापर करत आहोत. 1 हजार मतदानाला बॅलेट पेपर वरील निवडणुकीत अवघा 1300 रूपये तर खर्च येतो, तर हाच खर्च ईव्हीएम मशीनवरील मतदानासाठी 33 हजार रुपये येतो. हा खर्चाचा होणारा अपव्यय सर्वसामान्यांनी भरलेल्या कररूपी पैशातूनच होतो.”

खासदार उदयन राजेंनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ईव्हीएम ने झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदार संघात झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काहीच बोलत नाही.

निवडणूक आयोगाला आव्हान देत उदयनराजे पत्रपरिषदेत म्हणाले, ईव्हीएम मशीनवर झालेले मतदान आणि निकालादिवशी मतमोजणीवेळी ईव्हीएमवर आढळलेले मतदान यातील तफावतीचा खुलासा करण्याची मागणी केली.

माझ्या सातारा मतदार संघात देखील अनेक ठिकाणी हे प्रकार झालेत. असे प्रकार देशभरातील जवळपास 376 मतदार संघात झाल्याचे समोर आले असल्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारने ईव्हीएम बंद करून बॅलेटपेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली.