थायरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी ‘या’ पाच पदार्थाचे करा सेवन

thyroid - Maharashtra Today

मुंबई :- प्रत्येकाच्या गळ्यात एक फुलपाखराच्या आकारासारखी थायरॉइड (Thyroid) ग्रंथी (एंडोक्राइन ग्लँड) असते. त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर थायरॉइडची समस्या निर्माण होते. थायराईडमधील असंतुलनामुळे हायपोथायरायडिज्म, हायपरथायरायडिज्म आणि थायरॉयडिटिस यांचा त्रास होऊ शकतो. परिणामी, शारिरीक बदल घडून थकवा, केस गळणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, अनियमित मासिक पाळी अशाप्रकारच्या विविध त्रासांचा सामना करावा लागू शकतो.

जर या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर मधुमेह होऊ शकतो. आयुर्वेदात (Ayurveda) थायरॉइड वाढू नेय यासाठी अनेक उपायोजना सांगितल्या आहेत. आपल्याला पुरेशी काळजी घेऊनच या व्याधींपासून सुटका मिळवायची आहे. युरोपियन थायरॉईड असोसिएशन आणि अमेरिकन थायरॉईड असोसिएशनने 25 मे 2008 रोजी जागतिक थायरॉइड दिवसाची स्थापना केली होती. आपण काही विशिष्ट प्रकारचे आहार घेतल्याने आपण थॉयरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवू शकतो.

केळी

केळी हे बेरीचे एक रुप आहे. केळीला सूपरफूड म्हणूनही मानले जाते. यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. दिवसातून किमान एकदा केळे खाल्ल्यास थॉयरॉईडच्या त्रासापासून सुटका मिळवता येईल.

खिचडी

थॉयरॉईडचा त्रास टाळण्यासाठी पोटाचे आरोग्य अर्थात पोटाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या पोटातील गडबड अर्थात पोटाच्या आरोग्यातील असंतुलन थॉयरॉईड हार्मोनवर परिणाम करू शकते.

चण्याची डाळ

चण्यामध्ये प्रोटीन, आयरन, जिंक असतात. या सर्व घटकांची थॉयरॉईडच्या नियंत्रणात महत्त्वपूर्ण मदत होते.

केसर

केसर रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याउठल्या भिजत ठेवलेल्या या केसरचे सेवन करा. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना थॉयरॉईडचा त्रास टाळता येईल.

मच्छी

थॉयरॉईडच्या त्रासात भाजलेली मच्छी खाणे हादेखील एक आरोग्यदायी पर्याय ठरेल. या पर्यायाचा अधिक परिणाम अनुभवायचा असेल तर रात्रीऐवजी दिवसा फ्राय केलेली मच्छी खाण्यास प्राधान्य द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button