ट्रॅक्टर आमच्या अंगावरुन न्या, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केले ठिय्या आंदोलन !

ट्रॅक्टर आमच्या अंगावरुन न्या, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केले ठिय्या आंदोलन !

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) सुरू असलेले शेतकरी आंदोलन (Farmers Protest) केंद्र सरकार (Central Government) अतिशय हळुवारपणे हाताळते आहे. पोलीसही कमालीचा संयम दाखवत आहेत. आज काही शेतकरी ट्रॅक्टर रॅलीचा निर्धारित मार्ग सोडून घुसले आणि त्यांनी हिंसाचार केला. या शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यासाठी रोखण्याकरता नांगलोई परिसरात पोलिसांनी रस्त्यावर बसून निदर्शकांना आव्हान दिले, ट्रॅक्टर आमच्या अंगावरुन न्या ! यासाठी पोलिसांचे कौतुक होते आहे.

शेतकऱ्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीत घुसलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीन तास मोठ्या प्रमाणात हिंसा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER