या ठिकाणी घ्या गुलाबी थंडीचा आनंद

Tourism

दिवाळी आली कि सुट्ट्या देखील आल्याच. त्यात गुलाबी थंडीची देखील सुरुवात होईल. मघ या गुलाबी थंडीत सहल करायची आहे?? तर जास्त विचार करू नका… कारण आपल्या देशात इतकी सुंदर पर्यटनस्थळ आहेत की तुम्हांला फार ताप करुन घ्यायची गरज नाही. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये घ्या गुलाबी थंडीचा आनंद..

tourism-kashmir

  • जम्मू-कश्मीर :- हिवाळ्यात जर तुम्हांला बर्फवृष्टी आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर जम्मू कश्मीर हा बेस्ट पर्याय आहे. हिंदुस्थानच नंदनवन असलेले जम्मू कश्मीर हिवाळ्यात अधिकच खुलुन दिसते. पांढऱ्याशुभ्र बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगा , सभोवर पसरलेले हिरवेकंच वृक्ष, शिकाऱ्यातील प्रवास सगळचं नयनरम्य. हिवाळ्यात येथे अनेक साहसी खेळांचे आयोजन करण्यात येतं. पर्यटक यात मोठ्या संख्येने भाग घेतात.

tourism - shillong

  • शिलाँग :- हिवाळ्यात शिलाँगला जाण्याची वेगळीच अशी मजा आहे. द्वाकी येथून वाहणाऱ्या उन्मत नदीचं नितळ रुप डोळ्यात साठवून ठेवावसं वाटत. बोटीतून जाताना नितळ पाण्यातून दिसणारा नदीचा तळ तिच सौंदर्य अधिकच खुलवतो. हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी उसळते.

 

tourism- manali

  • मनाली :- हिवाळ्यात हिमाचल प्रदेशमधील मनालीला आवर्जून जावं. हिवाळ्यात येथे जोरदार बर्फवृष्टी होते. त्या बर्फवृष्टीत मनालीच्या टेकड्यांवर फिरणे यासारखा आनंद नाही. येथे सुट्टीच्या दिवसात आईस स्केटींग, पॅराग्लायडींग, रॅपलिंग, रॉक क्लायमिंग,करण्यासाठी सोलंग व्हॅली येथे पर्यटकांची गर्दी असते.

tourism - dalhousie

  • डलहौसी :- हिमाचल प्रदेशमधील डलहौसी हे देखील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी येथे हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. देवदार वृक्षांनी बहरलेल्या डलहौसीवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळन केली आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठी डलहौसीला जरुर जावं.
  • चोपटा, उत्तराखंड :- उत्तराखंडला देवभूमी असेही म्हणतात. प्राचीन मंदिरं आणि डोळ्यात भरणारा निर्सग ही उत्तराखंडची वैशिष्टय.

आपल्या कुटुंबासह किंवा आपल्या मित्रपरिवारासह या स्थळांना नक्की भेट द्या आणि हिवाळ्याचा आनंद लुटा.