
मुंबई :- एकीकडे राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंध लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्र (Vaccination Center) लस नसल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी (Mahavaikas Aghadi) सरकार आणि केंद्र सरकारमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या या दाव्यांवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केलेला असून, राज्य सरकारवरच नियोजन बरोबर केले नसल्याचे म्हटले आहे.
यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हान दिले आहे. शपथ घेण्याची season आहे म्हणुन..लसी च्या पुरवठ्यावर केंद्र सरकार वर आरोप करणाऱ्या नेत्यांनी स्व .मा .बाळासाहेबांची नाही तर एकदा उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शपथ घेऊन सांगा किती पुरवठा झाला ? आहे का हिम्मत ?बघा गायब होतील सगळे! असे म्हणत नितेश राणेंनी आव्हान केले आहे.
शपथ घेण्याची season आहे म्हणुन..
लसी च्या पुरवठ्यावर केंद्र सरकार वर आरोप करणाऱ्या नेत्यांनी स्व .मा .बाळासाहेबांची नाही तर एकदा उद्धव ठाकरेंची शप्पत घेऊन सांगा किती पुरवठा झाला ?
आहे का हिम्मत ?
बघा गायब होतील सगळे! 😅— nitesh rane (@NiteshNRane) April 9, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला