एमपीएससी परीक्षा ठरल्याप्रमाणेच घ्या, निदर्शकांची मागणी कायम; आंदोलन सुरूच राहणार

Protest - Gopichand Padalkar - MPSC Exam

पुणे : एमपीएससीची (MPSC) १४ मार्चची नियोजित पूर्वपरीक्षा ठरल्याप्रमाणेच घ्या, या मागणीवर निदर्शक ठाम असून परीक्षेची निश्चित तारीख घोषित होईपर्यंत रस्त्यावरच बसून राहू, अशी घोषणा निदर्शक व आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे (BJP) आमदार गोपीनाथ पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.

परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा झाल्यानंतर दुपारी १ वाजेपासून पुणे येथे रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रात्री ही परीक्षा ८ दिवसांच्या आत घेण्यात येईल व परीक्षेची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतरही निदर्शक, परीक्षा ठरल्याप्रमाणे १४ मार्चलाच घ्या या मागणीवर ठाम आहेत.

निदर्शकांनी रात्री ९ वाजता सांगितले की, ही परीक्षा याआधी ४ वेळा पुढे ढकलण्यात आली. गेल्यावेळी परीक्षा पुढे ढकलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, आत परीक्षेची तारीख (१४ मार्च) पुढे ढकलली जाणार नाही. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आमचा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर विश्वास नाही. परीक्षा कोरोनाच्या (Corona) साथीमुळे पुढे ढकलली असेल तर कोरोना ८ दिवसात कमी होणार आहे का? ज्या राज्यांमध्ये निवडणूक होते आहे तिथे कोरोना नाही का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER