लाईट घेऊन गेले शेतात ! देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा

Devendra Fadnavis

उस्मानाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा बारामतीपासून सुरु झाला. आज रात्री सव्वासातच्या सुमाराला ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रोसा गावात पोहचले. गावकऱ्यांनी लाईटची व्यवस्था केली होती. लाईटच्या उजेडात नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली.

पावसाने कांदा, सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. शेती वाहून गेली, असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी फडणवीसांच्या कानावर घातले. मदत न मिळाल्यास आत्महत्या केल्यावाचून आमच्याकडे पर्याय नाही, अशी हताशा व्यक्त केली. तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही. सरकारकडे जास्तीत जास्त मदत मागू, असे फडणवीस म्हणाले.

रोसा गावातही फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. पावसाने होत्याचे नव्हते झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने आमचे कंबरडे मोडले. काल-परवा पडलेल्या पावसाने सगळं धुऊन नेले. सरकारने तत्काळ मदत करावी’, अशा व्यथा शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर मांडली.

काळजी करु नका. सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेऊ. काळ कठीण आहे. परंतु जिद्द सोडू नका. सरकारशी भांडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन’, असा धीर फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER