घरगुती वीज बिल माफीसाठी शेजारील राज्यांचा आदर्श घ्या : डॉ एन डी पाटील

dr-nd-patil

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या शेजारील तीन राज्यांनी वीजबिल माफीचा निर्णय घेतला आहे, याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन महिन्यातील वीज बिल माफ करावे अशी मागणी डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर जिल्हा व शहर सर्वपक्षीय कृति समितीतर्फे डॉ. एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन केले होते.

दरम्यान, केरळ गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने स्थानिक नागरिकांचे लॉक डाऊन कालावधीतील वीज बिल माफीचा निर्णय जाहीर केला आहे. केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांनी एप्रिल ते जुनपर्यंतच्या बिलमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुज्यमंत्री शिवराजसीह चौहान यांनी एप्रिल ते जूनपर्यंत ज्यांचे मार्च महिन्याचे बिल १०० रुपये आहे त्यांनी एप्रिल ,मे , जुन महिन्याचे बिल महिना ५० रुपये प्रमाणे भरावे असे जाहीर केले गुजरात सरकारने २०० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांचे १०० युनिटपर्यंतचे बिल माफ करण्याचे जाहीर केले आहे.

साधारण २३०० कोटी रुपयांचे बिल गुजरात सरकारने माफ केले आहे, यांची सर्व माहिती ईमेल ने राज्यसरकारला पाठवली आहे. शेजारील राज्यांचा आदर्श घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला या करोनाच्या काळात आधार द्यावा, नाहीतर जनता शांत बसणार नाही जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे, जनता राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER