कोरोनाची लस घ्या, निःशुल्क बिअर प्या; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ऑफर

Joe Biden

वॉशिंग्टन :- जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगाने राबवणे सुरू आहे. अमेरिकेने त्यांच्या आपल्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत, म्हणजे ४ जुलैपर्यंत देश कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ‘कोरोना लस घ्या (Corona Vaccine) आणि बिअरचा निःशुल्क (Free Beer)आस्वाद घ्या’ अशी भन्नाट ऑफर घोषित केली आहे.

अमेरिकेत ४ जुलैपर्यंत ७० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘कोरोना लसीचा डोस घ्या आणि बिअर निःशुल्क मिळवा’ अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भाषणात केली. अमेरिकेत लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी ‘उबर’ व लिफ्टने मोफत प्रवास करता येणार आहे. लसीकरणामध्ये कृष्णवर्गीयांचा सहभाग कमी आहे. त्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button