महसूल चुकविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : राज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

कोल्हापूर :- गोव्यावरुन येणारे मद्य, हातभट्टी तसेच अन्य राज्यातून येणारी बेकायदेशीर दारु यावर कडक कारवाई करा. त्याचबरोबर महसूल चुकविणाऱ्यांवरही बारकाईन लक्ष ठेवून त्यांच्यावरही कारवाई करुन महसूल वाढवावा, अशी सूचना राज्य उत्पादन शुल्क तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतली. या बैठकीला विभागीय उपायुक्त यशवंत पवार, राज्य उत्पादन अधीक्षक संध्याराणी देशमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. देसाई यांनी गतवेळी सप्टेंबर अखेर जमा झालेला महसूल, यावर्षी जमा झालेला महसूल, लॉकडाऊन मध्ये केलेली कारवाई, दंड वसुली याबाबत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या युनिट‍ निहाय आढावा घ्यावा. गोव्यावरुन जिल्ह्यात येणारी दारु पूर्णपणे बंद झाली पाहिजे. अवैद्य मद्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. त्या शिवाय जिल्ह्याचा महसूल वाढणार नाही. उत्पादन शुल्क विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागापैकी एक प्रमुख विभाग आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. विभागाला मनुष्यबळा बरोबरच अन्य सुविधाही दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER