नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

CM Uddhav Thackeray

मुंबई :- मागल्या वेळेपेक्षा आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.

अंमलबजावणी करताना मनात गोंधळ नको
सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीत अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील आणि गोरगरिबांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे, तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा
मुख्यमंत्री म्हणाले की, “कोरोना (Corona) विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा आताचा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे, ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.”

रेमडिसिवीरबाबत काळजीपूर्वक पाऊले उचलावे लागेल
“ऑक्सिजनचा उचित वापर तसेच रेमडिसिवीरबाबत काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा ऑडिट त्वरित पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ही बातमी पण वाचा : नियम पाळा अन्यथा विनाकारण फिरल्यास पोलीस कारवाई करेल; गृहमंत्र्यांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button