हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उस्मानीवर कठोर कारवाई करा – फडणवीस

Devendra Fadnavis- Sharjeel Usmani

मुंबई : शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची दखल घेऊन राज्य सरकारने त्यावर तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली; यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे.

शरजील उस्मानी याने पुणे येथे ३० जानेवारी २०२१ रोजी एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल अवमानजनक, आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्यावर राज्य सरकारने तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER