राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्या; उदयनराजेंच्या फडणवीस आणि दरेकरांना शुभेच्छा

Praven Darekar & Devendra Fadnavis & Udyan Raje Bhosle

सातारा : प्रप्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी काळाच्या गरजेनुसार लवकरात लवकर राज्याची सूत्रं आपल्या हातात घ्यावीत, अशा भावना भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी व्यक्त केल्या.

प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) साताऱ्यातील उदयनराजेंच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सातारा दौऱ्यावर आहेत. उदयनराजे भोसलेंनी आपल्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी दरेकरांचे स्वागत केले. “प्रवीण दरेकर हे माझे मित्र आहेत. दरेकरांनी माझ्या घरी यावे, ही खूप दिवसांपासून माझी इच्छा होती, ती आज पूर्ण झाली.” अशा भावना उदयनराजेंनी व्यक्त केल्या. भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंनी ट्विटरवरून दिली.

“प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर राज्याची सूत्रं हातात घ्यावीत. सर्वसामान्य जनतेची सध्या ससेहोलपट होत आहे. बहुमत असूनही राजकारणामुळे हे सरकार होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे.” असंही उदयनराजे म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्यामुळे लोकहिताचे निर्णय आघाडी सरकार घेऊ शकत नाहीत. एकत्र विचार असतील तर कुठल्याच ताकदीच्या आमिषाची गरज लागत नाही. नजीकच्या काळात लवकरच देवाच्या कृपेने चांगलं घडेल आणि लोकांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अप्रत्यक्ष टीका उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली. “भाजपचा पाया घसरत चालला आहे का, या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय मोकळा नाही. ” असे म्हणत उदयनराजेंनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलायचे टाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER