अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मीसुद्धा सहभागी होईन; महाविकास आघाडीमधील मंत्र्याचा घरचा अहेर

Ajit Pawar - Nitin Raut - Maharashtra Today

मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमधील (NCP) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. महाविकास आघाडीमधील एका मंत्र्याने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे. आरक्षणासंदर्भात भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घरावर मोर्चा काढा, मीसुद्धा त्यामध्ये सहभागी होईन,  असे वक्तव्य केले आहे.

दलित आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात नाही. मंत्रालयामधील काही झारीमधील शुक्राचार्य कुणाच्या तरी दाबावाखाली येऊन या निर्णयासंदर्भात अडवणूक करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. याच पदोन्नतीसाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमातीच्या सेलमधील कार्यकर्त्यांना केले आहे. इतकेच नाही तर आपणही या मोर्चामध्ये सहभागी होऊ, असंही राऊत कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER