माझे ‘ते’ वक्तव्य मागे घेतो : वारिस पठाण

मुंबई : मला सर्व धर्मीयांचा आदर असून, मी भाजपाच्या १०० नेत्यांविरोधात बोललो होतो. १०० कोटी भारतीयांविरोधात माझे वक्तव्य नव्हते, मात्र, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे एएमआयएमचे नेते माजी आमदार वारिस पठाण यांनी म्हटले आहे.

मुंबईत आज झालेल्या पत्रपरिषदेत वारिस पठाण यांनी हे स्पष्टीकरण दिले.

वारीस पठाण यांचे शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस!

यावेळी बोलताना वारिस पठाण म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असून, माझ्या पक्षालाही बदनाम करण्यात येत आहे. माझे वक्तव्य हिंदूविरोधी नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. मी देशविरोधी नाही, असे ते यावेळी म्हणाले.