नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार माझ्यावर कारवाई करा : इम्तियाज जलील

Imtiaz Jalil Maharashtra Today

औरंगाबाद :- औरंगाबादमध्ये कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला. पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयासमोर गर्दी करत जल्लोष केला. यावेळी जलील यांना कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक काढली.

कोरोनाचा विसर इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पडला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यावर सर्व स्तरांवरून टीका करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. त्यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “माझ्याकडून चूक झाली.

माझ्यावर कायद्यानुसार जरूर कारवाई करा. जो कायदा सर्वसामान्यांना आहे, त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. पण, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा.” अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : इम्तियाज जलील यांचा डान्स  ;  खैरेंकडून अटकेची मागणी, खोपकर म्हणतात नाचताना शरम वाटली पाहिजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button