घ्या! आता भारतरत्नांचीच चौकशी होणार

sachin tendulkar & Lata Mangeshkar
  • लतादीदी,सचिनसह सेलिब्रेटीजची चौकशी आघाडी सरकार करण

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar), प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar),अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) यांच्या ट्विटची राज्य गुप्तवार्ता विभागामार्फत चौकशी होणार आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे ट्वीट काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीज ने केले होते त्याच्या प्रत्युत्तरात लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक भारतीय दिग्गजांनी आमच्या देशात उगाच लुडबूड करू नका असे  सुनावले होते. या सेलिब्रेटीजनी हे ट्विट कोणाच्या दबावाखाली केले होते काय याची चौकशी आता महाविकास आघाडी सरकार करणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला मंगळवारी दिले.

सध्या कोरोनाग्रस्त असलेले देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून सावंत यांनी ही मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरासाठी भाजपने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ट्विवटच्या भाजप कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली.टिष्ट्वट करणाऱ्यांमध्ये लतादीदी, सचिन होते.तसेचअभिनेता अक्षयकुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या ट्विटमधील सारखेच आहेत. अभिनेता सुनील शेट्टीने मुंबई भाजपच्या उपाध्यक्षाचा उल्लेख आहे, याकडे सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांचे लक्ष वेधले गृहमंत्री देशमुख यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, भारतीय सेलिब्रेटिजनी कुणाच्या दबावाखाली टिष्ट्वट केले काय याची चौकशी राज्य गुप्तवार्ता विभागामार्फत केली जाईल.

फडणवीस यांचा संताप

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीच्या गोष्टीबद्दल संताप व्यक्त केला ते म्हणाले की,भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडाच. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मान्य करणारे यांचीच चौकशी झाली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER