दुकानदारांबाबत तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा कोर्टात जाऊ; व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

Viren Saha - uddhav thackeray - Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने ठाकरे सरकारने (Thackeray Govt.) लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने लॉकडाऊनला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिल्याने आता राज्यातील व्यापारी वर्ग आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाईन विक्रीची परवानगी देण्यात आली. याउलट दुकाने बंद होत असल्यामुळे पारंपरिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा (Viren Shah) यांनी दिला आहे.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्या कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वस्तूंची ऑनलाईन पद्धतीने विक्री सुरू आहे. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असताना सरकार गप्प का बसले आहे? नियम हा सर्वांसाठी एकसारखा असायला हवा. त्यामुळे आता ठाकरे सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ते म्हणाले, ‘गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनविरोधात आता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या ४० दिवसांमध्ये व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटी बुडाले आहेत. ठाकरे सरकारच्या ‘मुंबई मॉडेल’ची देश-विदेशात चर्चा होते. आता राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सगळं काही अनलॉक केलंच पाहिजे, असा युक्तिवाद शहा यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारचा निर्णय; राज्यात लॉकडाऊन वाढला, १ जूनपर्यंत कडक निर्बंध राहणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button