सहकारी संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

Aurangabad HC

औरंगाबाद : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कोरोना महामारी यामुळे राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरासाठी लांबणीवर गेल्या. लांबणीवर गेलेल्या संस्थांच्या निवडणुकीत नव्या वाढीव सभासदांना मतदानाचा अधिकार देण्याबाबतची याचिका मंगळवारी औरंगाबाद उच्च न्यालयाच्या खंडपीठाने फेटाळली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश येताच ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबली होती तेथून पुढे निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

कोरोनामुळे समुह संसर्गाचा धोका आणि तत्पूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील ४५ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या होत्या. तसेच ३१ डिसेंबर २०२१ अखेर एकूण ६४ हजार ९९५ संस्था संचालकांची मुदत संपणार आहे. आता पहिल्या टप्यात निवडणुका पुढे गेलेल्या ४५ हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, वर्षभर निवडणुका पुढे गेल्याने वाढीव सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा आदी मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र,न्यायालयाने याचिका फेटाळून तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER